vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्रीयमंत्री पदाची संधी मिळाली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्रीयमंत्री पदाची संधी मिळाली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई/दिल्ली प्रतिनिधी – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड मोठी आहे शक्ती, जगभरात करोडो लोक करतात त्यांची भक्ती, जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान प्रज्ञासुर्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्ववंदनीय आहेत. त्यांचा मला आशिर्वाद आहे, त्यांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्र सरकारमध्ये तिस-यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. मी बौध्द आहे, मी सर्व जाती धर्मीयांना न्याय देण्याचे काम करीत राहणार. मी कुणालाही घाबरत नाही. मुझे नही किसी का डर, क्योंकी मेरे पिछे है बाबासाहेब आंबेडकर असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

 नवि दिल्लीतील मावळणकर सभागृह येथे भारतीय बौध्द संघाच्या वतीनं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर माजी केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी, तरुण चुग, समता सैनिक दलाचे ए.आर. जोशी, तसेच या कार्यक्रमाचे संयोजक भारतीय बौध्द महासंघाचे प्रमुख भंते डॉ. संघप्रीय राहुल, लतिका शर्मा, लालसिंह आर्या, राजकुमार आनंद, ज्ञानचंद्र गौतम, मुकेश सिरोही, बी. प्रताप आदि मान्यंवर उपस्थित होते.

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी जगात कुणाचीही जयंती साजरी होत नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगात सर्वात मोठया प्रमाणात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधान बदलण्याची भाषा कोणी करु नये, हे संविधाना कुणालाही बदलता येणार नाही. जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान राहील असे ना. रामदास आठवले म्हंटले आहे

00000

संबंधित पोस्ट

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले

दलित आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारावे : रामदास आठवलेंचे सूचक विधान*

vishwatmaklokswamivarta

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त भाजपाची जिल्हा कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य घराघरात पोहोचवूया – जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात सामाजिक कार्यक्रम राबविणार – महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण,”हा लोगो म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

समृद्धी महामार्ग अपघात : आठ मृतांच्या कुटुंबीयांना ४० लाखांची मदत-मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख रूपये