vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या बॅच प्रशिक्षणाचा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य समारोप

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोप

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या बॅच प्रशिक्षणाचा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य समारोप

नागपूर, प्रतिनिधी: राष्ट्रपती दौपदी मुर्मू दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असून 15 एप्रिल रोजी त्यांच्या मुख्य उपस्थितीत येथील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या द्वितीय दीक्षांत समारोहास त्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता एम्स येथील मुख्य सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहील.

या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती या लोकभवन येथे जाणार असून सायंकाळी 4.50 वाजता राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 78 व्या भारतीय महसूल सेवा बॅचच्या समावर्तन सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, महासंचालक सीबीचेन के. मॅथ्यू यांची उपस्थिती राहील.

या कार्यक्रमानंतर त्या लोकभवन येथे मुक्कामी राहणार आहेत. दिनांक 16 एप्रिल रोजी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमला त्या भेट देणार असून महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षान्त समारोहास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तेथील समारोह आटोपून राष्ट्रपती महोदय नागपूर विमानतळ येथून दिल्लीकडे प्रयाण करतील.

०००

संबंधित पोस्ट

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम• लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण..

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने,पेनटाकळी येथील गावकऱ्यांचे उपोषण मागे.. 

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) दि. २२.०५.२०२५ सकाळी ८:३० वाजेपर्यंत..

vishwatmaklokswamivarta