vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप

     अमरावती, प्रतिनिधी: जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आणि जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्यासाठी ‘आपत्ती प्रतिसाद किट’ उपलब्ध करून देण्यात आली आहे.    या उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहर पोलीस दलाला 47 आपत्ती प्रतिसाद किट वाटप करण्यात आली आहे. या संदर्भात गुरूवार, दि. 16 एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर पार पडले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे अध्यक्षस्थानी होते.    पोलिस कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात आपत्ती व्यवस्थापन किट हाताळणे, मोठी व मध्यम आकाराचे स्ट्रेचर, लाईफ जॅकेट, हॅडग्लोज, गमबूट, सेप्टी नेट, 30 मीटर रॅपलिंग रोप आणि किट स्टोरेज बॉक्सचा वापर करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच वैद्यकीय प्रथमोपचार सीपीआर, आपत्तीमध्ये जखमींना उचलण्याच्या पद्धती आणि प्राथमिक उपचार, यासह विविध आपत्तींचा सामना, पूर, आग, वीज कोसळणे, भूकंप आणि उष्माघातासारख्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी व कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी व्यक्त केला.

   सदर प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून क्रिएटिव न्यू टेक लिमीटेडचे प्रा. डॉ. विलास बैले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, आपत्ती व्यवस्थापन तज्‍ज्ञ अनुराग पचौरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन भारसाकडे, श्री. कढाणे आणि संतोष कविठकर उपस्थित होते. सुरेंद्र रामेकर यांनी प्रास्ताविक केले, सचिन धरमकर, विशाल निमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य आणि सुमीत बांबल यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.

 

000000

संबंधित पोस्ट

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक 2026.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in

ठाणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

आज*Not out 50…*स्वयम अभियान आणि W. W. F* च्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक आणि e-waste कलेक्शनचा ५० वा ड्रॉईव्ह