vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कुंभमेळा पर्वणी काळात येणारे भाविक व वाहतूकीचे सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

कुंभमेळा पर्वणी काळात येणारे भाविक व वाहतूकीचे सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळयात पर्वणी कालावधीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून मोठ्या संख्यने भाविक उपस्थित राहणार आहेत. यादृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार यासह पायी येणारे भाविक, त्यांना इच्छीत स्थळी पोहचण्याची व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, गर्दीचे नियोजन व अनुषंगिक बाबी याबाबत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची मत-मतांतरे जाणून घेत चर्चा करण्यात आली. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.विभागीय आयुक्त गेडाम म्हणाले की, प्रमुख पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असणार आहे. यादृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार या मार्गांनी येणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या गृहित धरून त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळाच्या धर्तीवर केलेले नियोजनाचा आधार घेत स्थानिक पातळीवरील अत्यावश्यक बाबी लक्षात घेवून नियोजन करावे लागेल. गर्दीचे नियोजन करतांना टप्प्याटप्यावर भाविकांसाठी पिण्याचे पाणी, भोजनाची उपलब्धता, आरोग्य सुविधांसह आवश्यक सोयी-सुविधा यास विशेष प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा धर्तीवर तयार करण्यात आलेल्या पर्वणी काळातील नियोजनाचे महानगरपालिकेद्वारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पोलीस, महापालिका आदी विभागांनी केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली. यावर उपस्थित सर्व प्रमुख अधिकारी यांनी आपल्या सूचना मांडल्या. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा धर्तीवर तयार करण्यात आलेल्या पर्वणी काळातील अंदाजित नियोजनाचे महानगरपालिकाद्वारे सादरीकरण करण्यात आले.

 

000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक #एसटी बससेवेचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मेपासून घरयादी व घरगणना होणार- निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे- 14 जूनपर्यंत चालणार कार्यवाही – प्रगणकांना परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजू भाऊ ताराचंद जाधव यांची जालना जिल्हाप्रमुख (जिल्हा समन्वयक ) म्हणून निवड पदवीधर विभाग कार्यक्षेत्र बदनापूर भोकरदन

आरोग्य विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यत प्रभावीपणे पोहोचवा- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta