vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याने ५६ लाख वृक्षांचे रोपण ही मोहिम राबविली जाणार

जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याने ५६ लाख वृक्षांचे रोपण ही मोहिम राबविली जाणार

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्रा’ (#MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत ५६ लाख वृक्षांच्या रोपणासह विविध उपक्रम राबवून राज्यातील हवामान कृतीला गती देण्यात येणार आहे. ‘जागतिक वसुंधरा दिन २०२६’ च्या निमित्ताने हा करार करण्यात आला.

याअंतर्गत मिशन लाईफ, सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंज, आर्टिस्ट फॉर द अर्थ, मुंबईला ‘सस्टेनेबल इव्हेंट्स कॅपिटल’ बनवणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यातील फ्लॅगशिप उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याने ५६ लाख वृक्षांचे रोपण ही मोहिम राबविली जाणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या ‘ग्रीनिंग महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ३०० कोटी वृक्ष रोपण मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेत केवळ वृक्षलागवडीवरच नव्हे, तर झाडांचे जगण्याचे प्रमाण, देखरेख आणि दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम यावर विशेष भर दिला जाणार आहे.#वृक्षारोपण#जागतिकवसुंधरादिन२०२६

संबंधित पोस्ट

शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

बालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश – मंत्री आदिती तटकरे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान : महसूल समाधान शिबिर’शिबिराद्वारे 58 हजार 990 नागरिकांना दिलासाविविध दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण, योजनांचा लाभ..

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही !वारीत नास्तिकतावाद व अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे ! – समस्त वारकरी संप्रदाय व संघटना

vishwatmaklokswamivarta

मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

शूटिंग स्टार्स २०२५’ सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे ५ डिसेंबर रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta