vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली*

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली*

मुंबई, प्रतिनिधी: वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘डॉ गोपाळराव पाटील यांना आपल्या परिसराविषयी मोठी तळमळ होती. ते व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ होते पण ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. या क्षेत्रातील नवनवीन संशोधन, ज्ञान तंत्रज्ञानाचा रुग्णांना लाभ व्हावा यासाठी ते प्रयत्नशील राहिले. लातूरला शिवछत्रपती शिक्षण संस्था स्थापन करून, त्याअंतर्गत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. या संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने डॉ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या जोरावर देशभरात ओळख निर्माण केली. डॉ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभा सदस्यत्वाची संधी मिळाली. राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे या महत्त्वाच्या विषय समित्यांवर काम केले. डॉ पाटील यांनी महाराष्ट्राच्या समाजकारण – राजकारणात निस्पृहपणे कार्य करण्याचा मानदंड निर्माण केला. त्या अर्थाने ते निरंतर सेवाव्रती होते. डॉ पाटील यांच्या निधनाने राज्याच्या वैद्यकीय सेवा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. पाटील कुटुंबीयांसह, त्यांच्या कार्यात सहभागी कार्यकर्त्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य• राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्यावतीने शक्ती संवादाचे आयोजन

जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवाव – जिल्हाधिकारी अशोक काकडे

कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा अहोरात्र कार्यरत

रुग्णालयांना पॅनलवर समावेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार

कठोर परिश्रम आणि कौशल्य हाच यशाचा खरा मंत्र – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta