vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पनीरच्या नावाखाली ॲनालॉगचा वापर- आढळल्यास आता थेट कारवाई

पनीरच्या नावाखाली ॲनालॉगचा वापर- आढळल्यास आता थेट कारवाई

जालना, प्रतिनिधी :- हॉटेलमध्ये चवीने पनीर टिक्का किंवा पनीर बटर मसालाच्या डिशमध्ये तुम्ही नक्की काय खाताय, याचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पनीरच्या नावाखाली स्वस्त दरातील चीज ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. ॲनालॉगचा वापर आढळल्यास थेट कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी दिले आहेत

शाकाहारी खवय्यांसाठी पनीर हा प्रथिनांचा मुख्य स्रोत मानला जातो. मात्र, वाढत्या नफेखोरीसाठी काही व्यावसायिक दुधापासून बनवलेल्या अस्सल पनीरऐवजी खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून तयार केलेले ॲनालॉग ग्राहकांच्या ताटात वाढत आहेत. हे दिसायला पनीरसारखेच असले तरी त्याचे पोषणमूल्य दुधाच्या पनीरपेक्षा पूर्णपणे वेगळे असते.

अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे स्वस्त पर्याय वापरले जात आहेत. यावर प्रतिबंध लावण्यासाठी प्रशासनाने आता नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये जर हॉटेलमध्ये ‘ॲनालॉग’ वापरले जात असेल, तर त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यूकार्ड किंवा डिस्प्ले बोर्डवर करावा लागेल. विक्री बिलावर केवळ पनीर न लिहिता डेअरी ॲनालॉग असा स्पष्ट उल्लेख करणे आता बंधनकारक आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या ऑनलाइन परवाना अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक तात्काळ अपडेट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नागरिकांनी पॅक बंद पनीर खरेदी करताना त्यावरील घटक नीट वाचून खात्री करा. सुटे पनीर घेताना ते शुद्ध दुधाचे असल्याची खात्री करा आणि संशय आल्यास पक्के बिल मागायला विसरू नका. ऑर्डर देण्यापूर्वी हॉटेलमध्ये पनीर आणि ॲनालॉग असे स्वतंत्र पर्याय आहेत का, याची विचारणा करावी. जर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले, तर ग्राहकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी यांनी केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक -राज्यपाल सी पी राधाकृष्णन-राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सागरी सप्ताहाचे उद्घाटन…

अमेरिका इजराइल-इराण संघर्षामुळे आजची परिस्थितीवर उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक काय म्हणाले ते पहा

टीबीमुक्त भारतासाठी १०० दिवसांची विशेष मोहीम; राज्यात व्यापक अंमलबजावणी