vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार; मुंबई–लंडन सहकार्याला चालना

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट-उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार; मुंबई–लंडन सहकार्याला चालना

मुंबई, प्रतिनिधी: सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम सूसन लँगली तसेच यूकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुंबई व महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अग्रगण्य केंद्र असल्याचे अधोरेखित करत उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या नव्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात आला.

लेडी मेयर डेम सुसन लँगली यांनी लंडन हे जागतिक भांडवल उभारणीसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारासाठी लंडन एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरू शकते, असे मत व्यक्त केले.यूकेचे प्रधानमंत्री केयर स्ट्रामेर यांच्या अलीकडील मुंबई भेटीदरम्यान उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी झालेल्या चर्चेचा सकारात्मक परिणाम आता गुंतवणूक प्रस्तावांमध्ये दिसून येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

मुंबई’ आणि ‘लंडन’ या जागतिक शहरांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी संरचित संवाद यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली. भारत–यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर उद्योग, पायाभूत सुविधा व शाश्वत वित्तीय क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

या भेटीत भविष्यात अधिक व्यापक सहकार्याच्या संधी शोधण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

विशेषलेख -कोकणातील साहित्यिक वाटचाल

vishwatmaklokswamivarta

एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारणार

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

vishwatmaklokswamivarta

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ,कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत.

vishwatmaklokswamivarta