vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड, मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन  

ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड, मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन

 

नांदेड दि. प्रतिनिधी :- जिल्‍हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्‍हयातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत निहाय प्राथमिक निवड / मुलाखत / निरंक शुध्दिपत्रक यादी, जिल्‍हा नांदेड सोमवार 11 मे 2026 रोजी https://nanded.gov.in/ https://setusamitinanded.in/ प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.

तसेच मुलाखतीस पात्र ठरलेल्‍या अर्जदारांचे मुलाखत 15 मे व 16 मे 2026 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे घेण्‍याचे प्रस्‍तावित आहे. तालुकानिहाय मुलाखतीचे वेळापत्रक नांदेड जिल्‍हयाच्‍या संकेतस्‍थळावर सविस्‍तरपणे प्रसिध्‍द करण्‍यात येईल. याबाबत कोणत्याही अर्जदारास वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही तसेच कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांनी https://nanded.gov.in/ हे संकेतस्थळ नियमितपणे पहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव सेतू समिती नांदेड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ऐरोली आदिवासी पाडा येथे उपयोगी साहित्याचे वितरण

vishwatmaklokswamivarta

करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा ६ मार्च रोजी

झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात भाडेतत्वावर भोजनकक्ष, उपहारगृहासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

     पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन                                        

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू