vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा ६ मार्च रोजी

करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा ६ मार्च रोजी

मुंबई, प्रतिनिधी: मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यांकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालयामार्फत ६ मार्च, २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, विद्यालंकार मार्ग वडाळा, (पू.) मुंबई-३७ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या प्राचार्य मनिषा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

या मेळाव्यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थांना त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, व्यक्तिमत्व, वैशिष्ट्ये याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकांमार्फत समुपदेहान (करिअर टॉक) देण्यात यंणार आहे. तसेच वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी करिअर व रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांना करिअर मार्गदर्शन आणि वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी जिल्ह्यातील नियोक्त्यामार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र (Appointment Letter) देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

10 जून रोजी कोकण विभागीयपेन्शन अदालत

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत..

जलसंधारणासाठी जालन्यात एकजूट; ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन’ संपन्न

छत्रपती संभाजीनगर कारागृहाला प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची भेट

अंबडमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणात आयोग आक्रमक; जिल्हा प्रशासनाला तातडीचा इशारा,अटक न झाल्याने संताप; पीडित कुटुंबाच्या आंदोलनाची दखल, आजच अहवाल सादर करण्याचे आदेश

सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्थेत शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता

vishwatmaklokswamivarta