vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

‘कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

     रांची (झारखंड) प्रतिनिधी: नाशिक येथील एका नामांकित कंपनीत अनेक हिंदु महिला कर्मचाऱ्यांचे झालेले लैंगिक शोषण आणि छळ, ही केवळ नाशिकपुरती मर्यादित घटना नसून तो एका ‘कॉर्पोरेट जिहाद’चा व्यापक भाग असल्याचे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. या गंभीर विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने झारखंडचे राज्यपाल माननीय श्री. संतोष कुमार गंगवार यांची भेट घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्यपालांनी या विषयावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

    समितीचे पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी राज्यपालांना माहिती दिली की, नाशिकच्या घटनेने कॉर्पोरेट जगतातील एका धोकादायक षड्यंत्राचा पर्दाफाश केला आहे. तिथे हिंदु तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धा दुखावण्याचे संघटित प्रयत्न करण्यात आले. असे ‘स्लीपर सेल’ रांचीसह देशातील इतर मोठ्या शहरांमधील आयटी कंपन्यांमध्येही सक्रिय असू शकतात, ज्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे समितीचे मत आहे.     भेटीदरम्यान राज्यपाल म्हणाले की, ते या संपूर्ण प्रकरणाची माहिती आजच पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांना पाठवतील. या संपूर्ण प्रकरणाची ‘एनआयए’मार्फत (NIA) चौकशी करण्यात यावी आणि देशभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ‘विशेष सुरक्षा ऑडिट’ लागू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच, ज्या कंपन्या अशा राष्ट्रविरोधी कारवाया रोखण्यात अपयशी ठरत आहेत, त्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणीही समितीने केली आहे.

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

 

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये अभिवादन

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गडचिरोलीत आरोग्य क्रांती : जागतिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*अहेरी येथे महिला-बाल रुग्णालयाचे लोकार्पण, सिरोंचात रुबी रुग्णालयाचे भूमिपूजन**औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप

vishwatmaklokswamivarta

पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे· पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्काराने सन्मान..

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन