vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

बॅकींग, फायनान्स, अग्रीकल्चर, शिक्षण क्षेत्रात रोजगाराची संधी पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन 

बॅकींग, फायनान्स, अग्रीकल्चर, शिक्षण क्षेत्रात रोजगाराची संधी पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व स्वा.से.राजासिंग हरिसिंग चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 12 मे 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून स्वा.से.राजासिंग हरिसिंग चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार असून या रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एसबीआय लाईफ इन्शुरन्स, मुथ्थुट फायनान्स लि, मेघदूत डेअरी प्रोडक्टस, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड या आस्थापनेकडून रिक्तपदे प्राप्त झाली असून ते प्रत्यक्ष उपस्थीत राहून मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, डिप्लोमा, आयटीआय, एचएससी उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक-युवतीसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डने लॉगीन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा पात्रतेनुसार बायोडाटाच्या आवश्यक प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथ​वा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२५१६७४ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. संबंधीत दिनांकास सकाळी १० वा. कार्यक्रमस्थळी उपस्थीत राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्याकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून लघु उद्योगासाठी अर्थसहाय..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी गती!विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना दावोस 2025 मध्ये स्वाक्षरी झालेल्या 51 करारांपैकी 17 ला मंजुरी,एकूण गुंतवणूक ₹3,92,056 कोटी

उद्योजकांनी मिलाप प्रणालीचा लाभ घ्यावा – प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे

vishwatmaklokswamivarta