vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, प्रतिनिधी सावेडी परिसरासाठी स्वतंत्र बस स्थानकाची अनेक वर्षांची मागणी होती. या बस स्थानकामुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवासीकेंद्रित होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

  मनमाड रोड परिसरात सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या सावेडी बस स्थानकाच्या भूमिपूजन समारंभात पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते.

कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उप महापौर ऍड. धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

   पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, शहराचा वाढता विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सावेडी परिसरात आधुनिक बस स्थानक उभारणे आवश्यक झाले होते. या बस स्थानकामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने अत्याधुनिक वातानुकूलित बसेस तसेच पर्यावरणपूरक ई-बसेस सुरू केल्या असून प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असून महामंडळ अधिक लोकाभिमुख होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बस स्थानकाचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह तसेच इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोकसहभागातून उभारण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमास पदाधिकारी, महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान; ‘कसं काय?’ मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभऔषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधित यंत्रणांना निर्देश