vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी ‘समाधान समारोह’ विशेष लोक अदालत वादांचे सलोख्याने निराकरण करण्यासाठी पक्षकारांना सहभागाचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी ‘समाधान समारोह’ विशेष लोक अदालत वादांचे सलोख्याने निराकरण करण्यासाठी पक्षकारांना सहभागाचे आवाहन

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- न्यायप्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवून “न्याय आपल्या दारी” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयामार्फत ‘समाधान समारोह’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दि. २१ एप्रिल २०२६ पासून झाला असून दि. २१, २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष लोकअदालतीत या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व वकील, पक्षकार तसेच संबंधित हितधारकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून वादांचे प्रभावी निवारण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिवाजी कचरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये पक्षकारांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच आभासी पद्धतीने (ऑनलाईन) सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा संमती-आधारित प्रक्रियेद्वारे सलोख्याने व जलद निपटारा करणे, हा या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून पक्षकारांना दीर्घकालीन न्यायप्रक्रियेतून दिलासा मिळून परस्पर सहमतीने वाद मिटविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली जिल्ह्यातील एकूण २४ प्रकरणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर येथे आयोजित विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आणि ज्यांना ती परस्पर संमतीने मिटविण्याची इच्छा आहे, अशी प्रकरणे देखील विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येणार आहेत.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर तसेच तालुका विधी सेवा समिती संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, राहाता, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड आणि अकोले येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ८५९१९०३६१६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsanagar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम तयारीचा,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंध) अधिनियम; अत्याचारात मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी• जिल्ह्यात 18 प्रकरणांचा समावेश • पात्र वारसांना दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

vishwatmaklokswamivarta