vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाली नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पाली नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: पाली नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीच्‍या संबंधात कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहिर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.

 प्रभागाचे नाव व क्रमांक-13,14, निवडणुक निर्णय अधिकाऱ्याचे नाव- उत्तम कुंभार, तहसिलदार, सुधागड, तहसिल कार्यालय सुधागड, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिका-याचे नाव- श्रीम.कोमल कराळे, मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत, नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दि. 18/05/2026 (सोमवार) ते दि.25/05/2026 (सोमवार), (सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 कालावधीत) ( दि.23/05/2026 शनिवार व दि.24/05/2026 रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार नाहीत), नामनिर्देशन पत्रे दाखल करण्‍याचे ठिकाण- नगरपंचायत कार्यालय पाली, ता. सुधागड,जि.रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दि.26/05/2026 (मंगळवार) सकाळी 11.00 वाजेपासून, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी अपील नसेल तेथे- दि.27/05/2026 (बुधवार) ते दि.02/06/2026 (मंगळवार) सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत, (दि.28/05/2026 गुरुवार, दि.30/05/2026 शनिवार व दि.31/05/2026 रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार नाहीत), अपिल असल्यास- वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल, अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यांत येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 कालावधीत मात्र दि.11/06/2026 (गुरुवार) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत. नामनिर्देशन पत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्याचे ठिकाण- नगरपंचायत कार्यालय पाली, ता. सुधागड,जि. रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- अपील नसेल तेथे : दि.02/06/2026 (मंगळवार) रोजी दुपारी 03.00 वाजे नंतर अपील असल्यास : दि.11/06/2026 (गुरुवार) रोजी दुपारी 03.00 वाजे नंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दि.20/06/2026 (शनिवार) सकाळी 7.30पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक 21/06/2026 (रविवार) सकाळी 10.00 वाजल्यापासून, मत मोजणीचे ठिकाण- हिरकणी कक्ष, तहसिल कार्यालय सुधागड-पाली, ता.सुधागड, जि.रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दि.23/06/2026 (मंगळवार) कलम 19 मधील तरतुदीनुसार

00000

संबंधित पोस्ट

शहर सुंदर ठेवणा-या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेख)-तंबाखूला नाही म्हणूया, आयुष्य सुंदर जगूया!”

14 जानेवारी रोजी कोकण विभागीय-पेन्शन अदालत

ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून गुन्हा केल्यास-ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध ऑनलाईन तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर..