vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विमानतळ परिसराचा १५ कि.मी.परीघ क्षेत्रात लेझर आणि बीम लाईट्सवर बंदी; पोलीस प्रशासनाचे आदेश

विमानतळ परिसराचा १५ कि.मी.परीघ क्षेत्रात लेझर आणि बीम लाईट्सवर बंदी; पोलीस प्रशासनाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- विमानतळावरून विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होताना वैमानिकांचे लक्ष विचलित होऊ नये आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विमानतळ परिसरातील फार्म हाऊस, मंगल कार्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स व बीम लाईट्सच्या वापरावर ५ जुलै २०२६ पर्यंत बंदी घालण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम किंवा फार्म हाऊसवरील पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर आणि बीम लाईट्सचा वापर केला जातो. या तीव्र प्रकाशझोतामुळे

 वैमानिकांच्या (पायलट) दृष्टीमध्ये अडथळा निर्माण होतो.विमान उतरवताना किंवा उड्डाण करताना लक्ष विचलित होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३)अन्वये लागू करण्यात आला आहे. विमानतळाच्या १५ किलोमीटर अंतराच्या परिघांमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत .आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर किंवा मालकांवर भारतीय न्याय संहितेचे कलम १६३आणि इतर प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल.दोषी आढळल्यास संबंधितांना शिक्षेस पात्र धरले जाईल.

विमानतळ परिसरातील सर्व मंगल कार्यालयाचे मालक, फार्म हाऊस चालक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार, यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर करावा – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील,जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा..

आयआयटी मुंबईच्या परीक्षेत कॉपी करताना पकडले गेल्यानंतर एका विद्यार्थ्या ने वसतीगृहात आत्महत्या केली

vishwatmaklokswamivarta

कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी. सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta