vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी :भारत सरकारच्या 16 व्या जनगणना-2027 प्रक्रियेअंतर्गत डिजिटल स्व-गणना (Self Enumeration) करण्याकरीता केवळ चार दिवसचा अवधी उरला असुन, जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी आपली डिजिटल स्व-गणना (Self Enumeration) करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

 

 देशातील 16 वी जनगणना जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत दोन टप्प्यात पार पडत आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर डिजिटल स्व-गणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

ही ऑनलाइन स्व-गणना प्रक्रिया 1 ते 15 मे, 2026 या कालावधीत राबविण्यात येत असून, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची डिजिटल स्व-गणना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित कार्यालयांतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ही प्रक्रिया निश्चित मुदतीत पूर्ण करावी. ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी अद्याप स्व-गणना केलेली नाही किंवा प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे, त्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करून त्याचा प्रमाणित अहवाल सादर करावा. संबंधित कार्यालयांनी 15 मे 2026 पर्यंत डिजिटल स्व-गणना पूर्ण करून 16 मे, 2026 रोजी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील नागरिकांनी स्व-गणना करुन घ्यावी

तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी देखील या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती अचूकपणे भरुन आपली स्व-गणना करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

निवृत्तीवेतन प्रकरणी येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी दि.27 जून रोजी ठाणे येथे पेन्शन अदालतीचे आयोजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा, ड्रोन व हवाई उपकरणांवर बंदी…

अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427

vishwatmaklokswamivarta

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया : कागदपत्र पडताळणी व प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ