vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध

इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध

सातारा प्रतिनिधी: शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत विभागाकडून केली जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही असणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीतजास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली माहिती भरावी व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा कार्यालयाशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्र. ०२१६२-२३९९३८

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास- सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

अन्नामृत’ची करामत…४० हजार बालकांची रोज‘अंगत पंगत’

vishwatmaklokswamivarta

महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

सीमा सुरक्षा दलाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त, बीएसएफच्या पहिल्या सर्व-महिला गिर्यारोहक पथकाने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केले

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

vishwatmaklokswamivarta

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन