vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य प्रतिनिधी-राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून हा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना व प्रतिक्रिया मागविण्यात याव्यात, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवनात ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व देण्यात येणाऱ्या सुविधाचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग उपसचिव वर्षा देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभाग अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, कामगार विभाग उपायुक्त संकेत कानडे, सार्वजनिक आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. आशिष भारती, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ प्रतिनिधी वंदना कोचुरे यांच्यासह महिला आयोगाच्या माजी सदस्य ॲड. संगीता चव्हाण उपस्थित होत्या.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ऊसतोड कामगारांच्या मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. कामगारांना गमबूट, इलेक्ट्रिक कोयता, ग्लोव्हज तसेच महिला कामगारांसाठी सॅनिटरी नॅपकिन यासारख्या आवश्यक साहित्याची खरेदी मान्सून सुरू होण्यापूर्वीच करावी व आवश्यक आर्थिक मदत डीबीटीच्या माध्यमातून तात्काळ वितरित करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

0000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

vishwatmaklokswamivarta

9 जूनला डाक अदालतीचे आयोजन

500 कोटींच्या विकासकामांच्या निविदा नियमांनुसारच*सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे खंडन*ऑनलाईन निविदांच्या आक्षेपांचे प्री-टेंडर कॉन्फरन्स द्वारे होते निराकरण*निविदा कालावधीनंतरही आर्थिक लिफाफा उघडण्यापूर्वी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मिळते संधी

दिल्लीच्या मराठी संमेलनाविरोधात विद्रोहीचा आवाज घुमणार छ.संभाजीनगरातअध्यक्ष,उद्घाटक व तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रम पत्रिका जाहीर !

vishwatmaklokswamivarta

माजी खासदार दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली जन्मगावी पवनार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवीन कायद्याद्वारे जलद व सुलभ न्याय – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी,मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन