vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचा 14 मे रोजी भूमिपूजन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचा 14 मे रोजी भूमिपूजन

                 बुलढाणा, प्रतिनिधी: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेज, बिरसिंगपूर, बुलढाणा येथील नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा दि. 14 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे शुभहस्ते मॉडेल डिग्री कॉलेज परिसर, अजिंठा रोड, ग्राम-बिरसिंगपूर, बुलढाणा येथे संपन्न होणार आहे.

 भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्राचे पालकमंत्री मकरंद जाधव (पाटील), वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्राचे सहपालकमंत्री संजय सावकारे व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर तसेच आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे, नगरपरिषद अध्यक्ष पूजा संजय गायकवाड, बिरसिंगपूर सरपंच वैशाली संजय शिंदे व विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेज, बिरसिंगपूर, बुलढाणा येथील नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळ्याला सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व मॉडेल डिग्री कॉलेज, बुलढाणाचे मानद संचालक डॉ.ए.आर. म्हळसने यांनी केले आहे.

  0000

संबंधित पोस्ट

साखर कारखान्यांनी लाभधारकांची पाणीपट्टी जमा करावी- कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार

vishwatmaklokswamivarta

अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुख दिलीप गाडेकर यांची निवड…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार -मुख्यमंत्री