vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला  नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

राज्य प्रतिनिधी- राज्यातील धर्मांतर लैंगिक छळ प्रकरणाचे फरार आरोपी कार्पोरेट जिहाद टीसीएस कंपनीतील मुख्य सूत्रधार निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथील एम आय एम चे नगरसेवक मतीन पटेल याने आश्रय दिल्या च्या आरोपावरून महानगरपालिकेने त्याच्या घरावर बुलडोझर चालवला असल्याची बातमी समोर येत आहे

मिळालेल्या माहितीनुसार

नाशिक येथील कथित कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले नगरसेवक मतीन पटेलच्या घर व कार्यालयावर महानगरपालिकेने अखेर बुलडोझर कारवाई केली. अतिक्रमण आणि बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत मनपा पथकाने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवली.मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनपाकडून यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती.

नाशिकच्या कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) घरावर महानगरपालिकेने बुलडोझर चालवला आहे. १३ मे २०२६ रोजी सकाळी, अनधिकृत बांधकाम आणि नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत, पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई करण्यात आली

. सदर कारवाई नारेगाव परिसरातील मतीन पटेल यांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर. ५ जेसीबी आणि पोलीस फौजफाट्याद्वारे अनधिकृत बांधकामाचा भाग जमीनदोस्त करण्यात आला.कारवाईचे कारण: नाशिक TCS धर्मांतर व लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला पटेल यांनी आश्रय दिला होता, असे समोर आले होते.कायदेशीर नोटीस: कारवाईपूर्वी महापालिकेने अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावली होती.प्रकरण काय आहे?नाशिकच्या आयटी कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ (लैंगिक छळ व धर्मांतर) प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान ही अनेक दिवसांपासून फरार होती. पोलिसांना चकवा देऊन ती छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल यांच्या घरी लपून बसली होती, जिथे तिला अटक करण्यात आली. यामुळे मतीन पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती. या कारवाईमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, या घटनेनंतर पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू होऊ शकते, असे संकेत मिळाले आहेत

संबंधित पोस्ट

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर• 15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद‌्घाटन- मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta