vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्न-प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा -मंत्री अतुल सावे

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्न-प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा -मंत्री अतुल सावे

राज्य प्रतिनिधी-राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर सयंत्र प्राधान्याने पूर्ण करावे तसेच प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तर दायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) नियामक मंडळाची १०८ वी तसेच ३१ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पुणे येथील महाऊर्जा भवन येते पार पडली. यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महाऊर्जा महासंचालक ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर व सर्व विभागांचे महाव्यवस्थापक, उपसंचालक लेखा व इतर अधिकारी उपस्थित होते.

श्री. सावे यांनी पीएम कुसुम योजनेमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉल सेंटर सुरू करावे. सध्याच्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी विभागाच्या सर्व इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची सूचना दिल्या.

यावेळी महाऊर्जा कार्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या प्रकल्प अधिकारी व लेखापाल यांना मंत्री श्री. सावे व श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत नागरिकांना घरपोच शासकीय सेवा – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे८० विभागांच्या तब्बल ४०२ सेवा आता नागरिकांच्या दारी

vishwatmaklokswamivarta

कराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

कुणबी जात प्रमाणपत्रःनागरिकांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta