vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

नांदेड द प्रतिनिधी:- खरीप हंगाम 2026 मध्ये विविध योजनांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर, मुग, उडीद, ज्वारी या योजनेत 10 वर्षांच्या आतील किंवा वरील अधिसूचित वाणांसाठी अर्ज करता येणार आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातील तेलबिया योजनेत सोयाबीन 5 वर्षांच्या आतील अधिसूचित वाणांसाठी अर्ज करता येणार आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर होणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांसाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ AgriLogin) या संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्याचे www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ पाहावे. संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अटी व शर्ती अर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक राहतील असेही कृषी विभागाने कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण..

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून अभियान यशस्वी करा – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जामिया उर्दू अलीगढची जालना कॉलेज ऑफ सोशल वर्कला अध्ययन केंद्राची मान्यताअदीब व अदीब-ए-माहिर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धएकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार..