vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्ह्यात 4 कोटी 80 लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा- सद्यस्थितीत एक टँकर, 7 विहिरींद्वारे पाणीपुरवठा – मागणी व आवश्यकतेनुसार नियोजन 

सांगली जिल्ह्यात 4 कोटी 80 लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा- सद्यस्थितीत एक टँकर, 7 विहिरींद्वारे पाणीपुरवठा – मागणी व आवश्यकतेनुसार नियोजन

सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज असून, जिल्ह्यात एकूण 66 टँकर्स तसेच 126 विहिरींचे अधिग्रहण व 9 विंधन विहिरी घेणे अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4 कोटी 80 लाख 48 हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक टँकर व सात विहिरी/बोअरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली.

दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 30 जून या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. त्यानुसार सन 2025-26 साठी जिल्ह्यात एकूण 66 टँकर्स तसेच 126 विहिरींचे अधिग्रहण व 9 विंधन विहिरी घेणे अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4 कोटी 80 लाख 48 हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार आहे. तसेच, ग्रामीण भागात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार टँकर सुरू करणे तसेच विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सध्या जिल्ह्यात काही गावांमध्ये विहीर व बोअरचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार खानापूर तालुक्यातील रेवणगाव आणि ऐनवाडी येथे प्रत्येकी दोन बोअर विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे एक बोअर तर करमाळे येथे एक बोअर आणि एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण सात बोअर/विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दरम्यान, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आटपाडी तालुक्यातील पिंपरी खु. (चव्हाण वस्ती) येथे एक शासकीय टँकर सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, ज्या भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढेल त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळोवेळी करण्यात येत आहेत.

00000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन* *पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून स्वागत*

आदर्श आचारसंहितेतील प्रस्ताव छाननी समितीमार्फतच सादर करावेत 

चेंबूर पेट्रोल पंप कुर्ला स्टेशन मार्गावरून नेहरूनगर डेपो अशी सेवा सुरू करण्याची मागणी-धारावीकरांना चेंबूर मध्ये जाण्यासाठी बस सेवेची अडचण-

एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे    • जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा • शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये; गाव पातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश

जेईई JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी