vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आज (दि.१६) आकाशवाणीवर; जनगणना याविषयावर देणार माहिती

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आज (दि.१६) आकाशवाणीवर; जनगणना याविषयावर देणार माहिती

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. शनिवार दि.१६ रोजी सकाळी ८ वा. ४० मि. नी. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर ‘जनगणना’ या विषयावर एका मुलाखतीद्वारे माहिती देणार आहेत. त्यांच्याशी याविषयावर जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बातचीत केली आहे.

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन ‘राष्ट्रीय जनगणना व त्यासंबंधित प्रक्रिया’, याविषयी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची जिल्हा माहिती अधिकारी श्री.मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत शनिवार दि.१६ रोजी सकाळी ८ वा. ४० मि. नी प्रसारीत होणार आहे. एफ.एम. 101.7 Mhz या वाहिनीवर ही मुलाखत ऐकता येईल आणि News on AIR ॲप वर ही मुलाखत देशाच्या कोणत्याही भागात ऐकता येणार आहे.

 जनगणना, प्रक्रिया, जिल्ह्यातील तयारी, लोकांचे शंकानिरसन अशा विविध मुद्यांवर त्यांनी या मुलाखतीतून जनगणना या विषयाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ही मुलाखत श्रोत्यांनी आवर्जून ऐकावी असे आवाहन कार्यक्रम अधिकारी सुजीत बनसोडे यांनी केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी* 

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्योगस्नेही धोरण व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश..

ठाणे प्रिमियर लीगचा बिगुल १ मे रोजी वाजणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते होणार उद्घाटन

पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समिती सदस्यांशी साधला संवाद