vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जेईई JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

जेईई JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड प्रतिनिधी :- जेईई JEE-Advanced 2026 परीक्षा रविवार 17 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात 4 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

या आदेशात नमूद केलेल्या आर.जी.जी. हायटेक डिजीटल झोन / राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, आय ऑन डिजीटल झोन विष्णुपुरी नांदेड, एसएसएस इंदिरा इंन्स्टीटूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी संयोग कॅम्पस नांदेड. श्री संभाजी कॉलेज ऑफ प्रायमरी शामल एज्युकेशन कॅम्पस देगावरोड समोर नांदला दिग्रस खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात रविवार 17 मे 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कार्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅल्क्युलेटर, ट्रॅन्टीस्टर, रेडिओ, लॅपटॉप, इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 500 मीटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या सूचना

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागाने राज्यस्तरावर नावलौकिक मिळवावा – पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्याच्या हस्ते विभागीय महसूल महोत्सवाचे उद्घाटन

जालना दर्गाह वक्फ मालमत्तेतील अनियमिततेवर त्वरित कारवाईची मागणी अर्जदारांचे व्यवस्थापन समितीला निवेदन

vishwatmaklokswamivarta

महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा – पालकमंत्री जयकुमार गोरे महिला कुस्ती स्पर्धेसाठी दरवर्षी ५० लाखांचा निधी शासनाकडून मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवणार

26 मेपासून अकोला येथे जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ