vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि आद्य क्रांतीकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ मे २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन नागोठणे येथील आद्य क्रांतीकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील विविध रिक्त पदे तसेच अॅप्रेंटिसशिपसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअर, पदवी इंजिनिअर तसेच इतर पदवीधर उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in⁠ या संकेतस्थळावर जाऊन Employment – Job Seeker (Find A Job) – Job Seeker Login या पर्यायाद्वारे लॉगिन करून आपली शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी. त्यानंतर ‘Pandit Dindayal Upadhyay Job Fair’ या पर्यायातून आपला जिल्हा निवडून उपलब्ध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करावा.

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांना विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच स्वयंरोजगारासाठी उपलब्ध योजनांबाबत माहिती देण्यात येणार असून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांची माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहितीही वरील संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड, सहायक आयुक्त श्रीम. अ. मु. पवार यांनी केले आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचण आल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०२९ किंवा लिपिक टंकलेखक, महेश वखरे यांच्या ९४२१६१३७५७ या भ्रमध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

मुखेड तालुक्यात #भूकंपाचे सौम्य धक्के* *नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 

vishwatmaklokswamivarta

जामिया उर्दू अलीगढची जालना कॉलेज ऑफ सोशल वर्कला अध्ययन केंद्राची मान्यताअदीब व अदीब-ए-माहिर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

१४ वर्षांचा सामाजिक बहिष्कार अखेर मागे;अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे मोरे कुटुंबीयांना न्याय.

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षण १० ऑगस्टपासून