vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठीपात्र व्यक्तींनी ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठीपात्र व्यक्तींनी ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

अहिल्यानगर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या निर्देशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची ३ वर्षांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी दि. ३१ मे २०२६ पर्यंत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांच्या कार्यालयात अर्ज व आवश्यक कागदपत्रे दोन प्रतींत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘क’ व ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीच्या प्रक्रियेसाठी सहकार खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, शासकीय विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, वकील, सनदी लेखापाल, प्रमाणित लेखापरीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व खासगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक, तसेच सहकारी संस्थांतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि निवडणूक कामकाजाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे.

नामतालिका तयार करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी १ जून ते १५ जून दरम्यान करण्यात येईल. त्यानंतर पात्र निवडणूक निर्णय अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका १६ जून ते २३ जून २०२६ या कालावधीत तयार करण्यात येणार आहे. अंतिम यादी ३० जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

हे अर्ज व आवश्यक कागदपत्रे संबंधित जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व सहकार आयुक्त यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील  नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद..

मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन..

vishwatmaklokswamivarta

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

मुद्रांकाचे अतिरीक्त शुल्क आकारल्यास तक्रार करावी

vishwatmaklokswamivarta

माणगाव, तळा व म्हसळा येथील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा..

vishwatmaklokswamivarta