vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गावदेवी दुर्घटनेतील शहीद सागर शिंदे यांना मानवंदना

गावदेवी दुर्घटनेतील शहीद सागर शिंदे यांना मानवंदना

ठाणे प्रतिनिधी) : गावदेवी भाजी मंडई परिसरात आगलेली आग विझवताना शहीद झालेले अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे यांचे पार्थिव नितिन कंपनी येथील अग्न‍िशमन केंद्र येथे आणण्यात आले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, नगरसेवक योगेश जानकर, मुकेश मोकाशी, नारायण पवार, अभिजीत पवार अतिरिक्त आयुक्‌त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे यांनी शहीद सागर शिंदे यांना मानवंदना दिली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शहीद सागर शिंदे यांच्या मातोश्री जयश्री शिंदे, पत्नी माधुरी शिंदे यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले

  यावेळी ठाणे अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल, नवी मुंबई अग्शिमन दल, पनवेल अग्निशमन दल, कुळगांव बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी यांनी देखील शहीद सागर शिंदे यांना मानवंदना दिली.

या दुर्घटनेत मृत पावलेले सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर (वय 55) यांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांचे मूळ गावी गाडेकरवाडी, गंगापूर, आंबेगाव, जिल्हा पुणे येथे नेण्यात आले.शहीद सागर शिंदे यांना मानवंदना देताना महापौर शर्मिला पिंपळोलकरशहीद सागर शिंदे यांना मानवंदना देताना महापालिका आयुक्त सौरभ राव

0000

संबंधित पोस्ट

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव…

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा-स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी ट्रॅक्टरसाठी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावा

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

पीक कर्ज वितरण आणि स्वयंरोजगारांना अर्थसहय्य यासाठी सकारात्मक काम करा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे बँकांना निर्देश*

vishwatmaklokswamivarta