vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार; देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले! मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने धडकली

राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार; देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले! मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने धडकली

 

   राज्य प्रतिनिधी       महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांच्या जमिनी हिरावून घेणारा आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात आणणारा आहे. सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा करण्याच्या तयारीत असल्यामुळे, या अन्यायी कायद्याविरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघासह राज्यातील अष्टविनायक मंदिरे आणि सर्वच प्रमुख मंदिरांचे १,००० हून अधिक विश्वस्त, मंदिर प्रतिनिधी आणि हिंदू संघटनांनी दंड थोपटले आहेत.

 

          या कायद्याच्या निषेधार्थ राज्यभरातील मंदिर विश्वस्तांनी थेट माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, राज्यमंत्री, आमदार तसेच सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना एकाच वेळी ३०० हून अधिक निवेदने सुपूर्द केली आहेत. हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवणारा हा जुलमी कायदा सरकारने विनाअट त्वरित मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली आहे. या जनक्षोभाची गंभीर दखल घेत, राज्यातील अनेक आमदारांनीही जनभावनांचा आदर करत ‘‘येत्या पावसाळी अधिवेशनात या कायद्याला विरोध करू’’, अशी ठाम भूमिका मंदिर प्रतिनिधींकडे मांडली आहे.

 

          या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक राजघराण्यांनी मंदिरांच्या नैवेद्य, अन्नछत्र व उत्सव यांसाठी शेकडो एकर जमिनी ‘इनाम’ म्हणून मंदिराच्या नावावर केल्या होत्या. प्रस्तावित कायद्याच्या कलम ३ आणि ४ मुळे ही सर्व इनामे एक झटक्यात रद्द करून, या देवाला दान केलेल्या जमिनी खासगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा डाव आहे. या कायद्यातील कलम १ (उपकलम २) अत्यंत पक्षपाती आहे. याद्वारे वक्फ बोर्डाच्या जमिनींना या कायद्यातून पूर्णपणे वगळून विशेष संरक्षण देण्यात आले आहे. एकीकडे हिंदू मंदिरांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत आणि ज्या वक्फने हजारो हिंदूंच्या जमिनी बेकायदेशीरपणे लाटल्या आहेत, त्या वक्फच्या जमिनींना संरक्षण दिले जात आहे. हा धार्मिक भेदभाव हिंदूंच्याच मतांवर निवडून आलेले सरकार करत आहे, हे दुर्दैव आहे. या मसुद्यातील कलम १८ नुसार, महसूल अधिकाऱ्यांच्या कोणत्याही मनमानी निर्णयाविरोधात भाविक किंवा विश्वस्तांना दिवाणी न्यायालयात (Civil Court) दाद मागता येणार नाही. म्हणजे हिंदूंसाठी लोकशाहीत न्यायालयाचे दरवाजे बंद केले जात आहेत. देवस्थानच्या जमिनींवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याऐवजी, १ जानेवारी २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना थेट मालकी हक्क बहाल करणे म्हणजे देवस्थानच्या पवित्र मालमत्तेची कायदेशीर लूट करण्यासारखेच आहे.

           या राज्यव्यापी आंदोलनाची गंभीर दखल घेत रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ‘सदर कायदा करू नये’ म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वतः मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. यावर मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांनी महसूलमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक घेऊ, असे सांगितले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

vishwatmaklokswamivarta

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

vishwatmaklokswamivarta

11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा-परीक्षा केंद्रांवर गैर प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार -राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर

vishwatmaklokswamivarta

इलेक्ट्रिक ट्रक’ निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्तेउदघाटन..भाजपा मुळे माझी महाराष्ट्राभर ओळख – भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपा जगातील नंबर वन पक्ष – रावसाहेब पाटील दानवे

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज. खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे