vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक मोहिमेचे सुरुवात

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक मोहिमेचे सुरुवात

           नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व मा. अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व मा. उप आयुक्त (अतिक्रमण/अ.बां.नि.वि.) श्री. संजय शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत घर क्र- 166, ऐरोली गाव, ऐरोली, नवी मुंबई येथे श्री. हितेश किशोर कोटकर यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते.

श्री. हितेश किशोर कोटकर, घर क्र- 166, ऐरोली गाव, ऐरोली, नवी मुंबई यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांस जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये दि. 16.04.2026 रोजी नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.

सदरचे अनधिकृत बांधकाम श्रीम. साधना पाटील, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी ऐरोली, यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले.

धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी, मजूर 16, ब्रेकर-3, गॅसकटर-1, तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.

यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित

पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन 

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील मशीद स्फोट प्रकरण- दोन्ही आरोपींविरोधात यु ए पी ए लागू…

vishwatmaklokswamivarta