vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

भारतीय हवाई दलाने तांत्रिक शाखेत अधिकारी संवर्गात पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर

भारतीय हवाई दलाने तांत्रिक शाखेत अधिकारी संवर्गात पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर

राज्य प्रतिनिधी-भारतीय हवाई दलाने तांत्रिक शाखेत अधिकारी संवर्गात पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर केली असून गेट चाचणी अर्थात अभियांत्रिकी विभागासाठीच्या पदवीधर अभियोग्यता चाचणीमधील गुणसंख्येच्या आधारे पात्र उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.

 या नव्या उपक्रमांतर्गत, वैध गेट गुणसंख्या मिळवलेले उमेदवार हवाई दलाच्या निवड मंडळासमोरच्या चाचणीसाठी थेट निवडले जाण्यास पात्र ठरतील. ही निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार असल्यामुळे उमेदवारांना एएफसीएटी अर्थात हवाई दलाच्या सामायिक प्रवेश चाचणीसारख्या प्राथमिक लेखी परीक्षेतून सूट दिली जाईल.

गेट गुणसंख्येच्या आधारावर राबवली जाणारी ही योजना केवळ तांत्रिक शाखेतील समावेशासाठीच लागू असेल. मात्र, एएफसीएटी ही यापुढेही तांत्रिक शाखेसह भारतीय हवाई दलाच्या सर्व शाखांमधील समावेशासाठी प्रमाणित प्रवेश चाचणी म्हणून भूमिका बजावत राहील.

संबंधित पोस्ट

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत

1 जून  ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

vishwatmaklokswamivarta

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्धांना  घरकुलासाठी मिळणार ₹२.५० लाख- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटीलØ सर्व नगरपरिषद क्षेत्रात रमाई आवास योजना सूरुØ गरजुंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार…

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन सतर्क* *मॉक ड्रिल, सागरी व मर्मस्थळ सुरक्षा वाढवली*