vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

 

कोल्हापूर, प्रतिनिधी एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर यांच्या वतीने व एनसीसी डारेक्टरेट महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IGSSC)- 2026 चे आयोजन दिनांक 27 ते 29 मे 2026 या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर येथील शूटिंग रेंजवर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध एनसीसी ग्रुप मुख्यालयांतील गुणवंत एनसीसी कॅडेट नेमबाज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेच्या 27 मे रोजी महाराष्ट्रातील सर्व एनसीसी ग्रुप मुख्यालयांच्या संघातील प्रत्येकी 5 मुले एनसीसी कॅडेट (फायरर्स) यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक कॅडेटने 0.22 स्पोर्ट्स शूटिंग रायफलमधून 46 राऊंड्स फायर करून आपले नेमबाजी कौशल्य, शिस्त व एकाग्रतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. एनसीसी कॅडेट्समध्ये नेमबाजी क्रीडेला चालना देणे तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम नेमबाज घडविणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

गुरुवार, दिनांक 28 मे 2026 रोजी प्रत्येक ग्रुप मुख्यालयाच्या संघातील 5 मुली एनसीसी कॅडेट (फायरर्स) या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर, स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 29 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्स व विजेत्या संघाचा गौरव करण्यात येणार आहे. ही स्पर्धा एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर ब्रिगेडियर आर.के. पैठणकर ग्रुप कमांडर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एनसीसी अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये आणि क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांच्या समन्वयाने यशस्वीपणे पार पडत आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील एनसीसी कॅडेट्समध्ये शिस्त, क्रीडा भावना व नेमबाजीतील प्राविण्य वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

*****

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव आजपासून बुलढाण्यात..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवांना,जातवैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय लवकरच- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सिंधुदुर्गातील आदिवासी ठाकर समाजाला जात वैधता प्रमाणपत्रदेण्याबाबत निर्णय घेण्याची मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मागणी

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी  15631 जागांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध, मंत्रिमंडळानं 12 ऑगस्टच्या बैठकीत 15631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा