vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा समाजाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती!

मराठा नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती!

 

राज्य प्रतिनिधी 📍अंतरवाली सराटी-मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भात अंतरवाली सराटी येथे श्री. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आश्वासित केले

शासनाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध विषयांशी संबंधित एकूण बारा मुद्यांची तपशीलवार माहिती त्यांना सादर करण्यात आली असून या चर्चेदरम्यान त्यांनीही सकारात्मक भूमिका दर्शविली. काही प्रलंबित प्रश्नांबाबत कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करून विधी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने नेहमीच न्याय्य, संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतली आहे. समाजहित आणि कायदेशीर चौकटीचा समतोल साधत शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, भविष्यातही याच भूमिकेतून कार्यवाही करण्यात येईल.

मराठा समाजाच्या हितासाठी शासन सकारात्मक असून संवादाच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्याची विनंती श्री. मनोज जरांगे पाटील यांना केली.

0000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क नंबर व व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरु

परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”; ५.८४ कोटीचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

एम्समधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते नूतनीकृत ‘अंधेरी आर.एस. टपाल कार्यालया’चे लोकार्पण 

आज 26 वा कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम