vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शेळीपालन, कुक्कुटपालन व गाय-म्हैस पालन प्रशिक्षणासाठी बुलडाण्यात पाच दिवसीय शिबिर

शेळीपालन, कुक्कुटपालन व गाय-म्हैस पालन प्रशिक्षणासाठी बुलडाण्यात पाच दिवसीय शिबिर

बुलढाणा द प्रतिनिधी: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या सहकार्याने सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच गाय-म्हैस पालन या विषयांवरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. ९ जून ते १३ जून २०२६ या कालावधीत बुलडाणा येथे होणार आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना तंत्रशुद्ध मार्गदर्शन देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन आणि गाय-म्हैस पालनाच्या विविध पद्धती, पशुधनाच्या जाती, लसीकरण, रोग व त्यांची लक्षणे, खाद्य व्यवस्थापन, चारा निर्मिती तसेच व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

याशिवाय उद्योजकता विकास, उद्योग संधी, शासकीय योजनांची माहिती, आर्थिक सहाय्य व उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींकडून करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार किमान ५ वी उत्तीर्ण व वय वर्षे १८ पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या सहभागी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी नोंदणी, शुल्क व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दि. ९ जून २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत श्री. गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९०११५७८८५४ किंवा ८२७५०९३२०१ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

अधिकाधिक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी श्री. किशोर अंभोरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना- तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश..

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा· पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे· वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा· खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशाेत्सव साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाट गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीची बैठक