vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सिंदखेडराजा येथे ५ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बेजगारांसाठी सुवर्णसंधी

सिंदखेडराजा येथे ५ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बेजगारांसाठी सुवर्णसंधी

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच STEP अंतर्गत अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि राजमाता पॅरामेडिकल कॉलेज, सिंदखेडराजा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा शुक्रवार, दि. ५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता राजमाता पॅरामेडिकल कॉलेज, मेहकर रोड, सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात क्विझ कॉर्पोरेशन, नागपूर यांच्या माध्यमातून महानगर गॅस लिमिटेड, मुंबई आणि टाटा मोटर्स, पुणे या नामांकित कंपन्यांनी विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती प्रक्रिया राबविणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, आयटीआय, पदवीधर तसेच STEP अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले पुरुष व महिला उमेदवार सहभागी होऊ शकतात. कंपनी प्रतिनिधींकडून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करण्यात येणार असून नामांकित कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध होणार आहे.

उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची संधी राहणार आहे. इच्छुकांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह ५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून नोंदणी करावी आणि मुलाखतीस सामोरे जावे. जिल्ह्यातील पात्र, गरजू व रोजगार इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथे अथवा दूरध्वनी क्रमांक (०७२६२) २४२३४२ वर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन..

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले व्हावे – मंत्री ॲड. आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाची पाहणी..

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा नागेवाडी जालना या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव..