vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण राज्य पथकाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन..

जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण राज्य पथकाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन..

अकोला, प्रतिनिधी : जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन शोध व बचाव पथकांचे प्रशिक्षण काटेपूर्णा प्रकल्‍प येथे आज झाले.

आगामी मान्सूनकाळ लक्षात घेता पथकांचे प्रशिक्षण व साधनसामग्री तत्काळ उपलब्ध करून निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले होते. त्यानुसार तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. बार्शीटाकळीचे तहसीलदार रवींद्र कापशीकर, गटविकास अधिकारी श्री. मोरे उपस्थित होते. नागपूर येथील राज्‍य आपत्‍ती प्रतिसाद पथकाचे डी. जे, दाते, ए. ए. सिकंदर , डी.व्ही. काळे यांचे जिल्हा पथकाला मार्गदर्शन केले.

अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातुर, बाळापूर तालुक्‍यातील पोलीस, होमगार्ड, अग्निशमन विभाग कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, स्‍वयंसेवी संस्‍था प्रतिनिधी, आपदा मित्र यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.

पूरस्थिती निवारण शोध व बचाव प्रथमोपचार, आधुनिक बचाव साहित्‍य ,बोट प्रशिक्षण व प्रात्‍यक्षिक आदींची माहिती प्रशिक्षणात देण्‍यात आली. पुढील मान्‍सुन कालावधीच्‍या अनुषंगाने विविध स्‍तरावरील घटक प्रशिक्षित असावेत यासाठी हे प्रशिक्षण महत्‍वाचे ठरले,

या प्रशिक्षणात राज्य पथकाचे पोलीस निरीक्षक व आपत्ती व्यवस्थपन पथकाचे सुनील कल्ले, हरिहर निमकांडे, दीपक सदाफळे ,उमेश आटोटे,रणजीत घोगरे, विजय माल्टे, वीर भगतसिंह पथक, बचाव पथक, माँ चंडिका बचाव पथक कुरणखेड, पोपटखेड, वंदे मातरम आपत्‍कालीन मदत पथक आदी पथकांचे सहकारी सहभागी होते.

०००

संबंधित पोस्ट

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांच्या वतीने सायक्लोथॉनव्दारे व्यापक ‘गर्भाशय कर्करोग जनजागृती’

vishwatmaklokswamivarta

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिनस्त सात गाळे भाडे तत्वावर देण्यात येणार§ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी यांना संधी§ अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत..

vishwatmaklokswamivarta