vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु 

अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, गणेश मंदिर शेजारी, विजयनगर, वरसोली अलिबाग येथे कार्यरत आहे. या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपाल, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग जी.व्ही.विहाडे यांनी केले आहे.

  या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती 85 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के व विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थ्यांकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दुध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी/उसळ, लोणचे पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते.

 अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रू.1300/- निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र महा.विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त रेनकोट, छत्री भत्ता, संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडा साहित्य,मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

  प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थीनींकरिता रूपये 2 लाख 50 हजारचे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष विद्यार्थीनींकरिता रू.1 लाखाचे आत असावे. शालेय विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता अर्ज सादर करावयाचा दि.30 जून 2026 पर्यंत तर इयत्ता 11 वी व 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थीं प्रवेशाकरिता अर्ज सादर करावयाचा दि.15 जुलै 2026 पर्यंत आहे

     प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2025-26 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक,आधारकार्ड, शाळा/कॉलेजचे बोनाफाईड, रेशनकार्डची या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच https://hmas.mahait.org, या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिक माहितीकरिता गृहपाल, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह जी.व्ही.विहाडे (मो.9503116595) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

००००००

संबंधित पोस्ट

समाजमाध्यमांद्वारे ग्राहकांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

03 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या ‘वेव्हज्’ परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर…

पंतप्रधान कार्यालयानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडूनही प्रस्तावाला गती; नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्गासाठी दुहेरी सकारात्मक हालचालPMO ने रेल्वे बोर्डाकडे पाठविला प्रस्ताव; जिल्हाधिकारी कार्यालयानेही विभागीय आयुक्तांकडे केला वर्ग — केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांच्या पाठपुराव्याला यश

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन