vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक २१ जून २०२६रोजी ‘नीट’ (NEET) परीक्षा आयोजित करण्यात आली असून, ती सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांनी सज्जता पूर्ण केली आहे. जिल्ह्यात एकूण ५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा संपन्न होणार असून, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे सर्व नियुक्त अधिकारी यांनी समन्वयाने, जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नीट परीक्षेच्या आयोजनासंदर्भात समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी . जी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेचे नियोजन आणि सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 जिल्ह्यात ५० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून यात शहरात ४७ आणि ग्रामीण भागातील तीन परीक्षा केंद्र असणार आहे.जिल्ह्यातील १७ हजार ७३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. दुपारी २:०० ते ५.१५ वाजता होणार आहे.प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र केंद्र निरीक्षक, पोलीस बंदोबस्त अधिकारी आणि परीक्षा कार्यरत दंडाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.परीक्षा केंद्राच्या परिसरात सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून ड्रोनद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड येथे महानगर पालिकेच्या विशेष बस ची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्याग व्यक्ती साठी परीक्षा केंद्रावर मदत आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने तपासणी आणि उपस्थिती घेतली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे आहे. परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्रावर (Hall Ticket) दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नियुक्त अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला आपापसात समन्वय ठेवून परीक्षा शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या बैठकीला पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त श्री. रत्नाकर नवले, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, संतोष गोरड, विजय चव्हाण, प्रवीण फुलारी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्यासह महावितरण विभाग आणि परीक्षा समन्वयक उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतबांधावर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती या घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दहा डिसेंबर सकाळी एक वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक-मध्य रेल्वेने कल्याण आणि लोणावळा स्थानकांदरम्यान आवश्यक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी एक विशेष अभियांत्रिकी ब्लॉक जाहीर

vishwatmaklokswamivarta

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

गरीब आणि मध्यमवर्गीयांना आरामदायी आणि उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव