vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, या योजनांचा लाभ घेण्याकरिता इच्छुकांनी https://vnvjntdc.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार, राजे उमाजी नाईक, परमपुज्य गंगानाथ महाराज, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी, श्रीकृष्ण आणि विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) अंतर्गत बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रूपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबवून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहणार आहे. तथापि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल १२ टक्क्यापर्यंतचे व्याज लाभार्थीचा बँक खात्यावर महामंडळाच्यावतीने जमा करण्यात येणार आहे. एक लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थीने २ हजार ८५ रुपायांचा नियमितपणे ४८ समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड केल्यास लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही, परंतु थकित हप्त्यांवर द.सा.द.शे. ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी-विग, सर्वे क्र. १०५/१०६, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, आळंदी रोड, येरवडा, पुणे तसेच कार्यालयाच्या ०२०-२९७०३०४९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

#विमुक्तजाती #भटक्याजमाती #महामंडळयोजना #शासकीययोजना #पुणे #स्वावलंबन #आर्थिकसहाय्य

संबंधित पोस्ट

संकल्पशील आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांच्या संकल्पनेतून तळणी येथे पार पडली महिलांना बचत गटातून स्वावलंबी बनवण्याची मार्गदर्शनपर बैठक…

तृतीयपंथीय उमेदवारांसाठी गुरूवारी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करा*

उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

vishwatmaklokswamivarta

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

 – ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम