vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन उत्साहात साजरा

सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन उत्साहात साजरा

बुलढाणा प्रतिनिधी: जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिंदखेडराजा व ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास दराडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करताना नवविवाहित तसेच विवाहयोग्य युवक-युवतींनी विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करून घेणे हा आजार नियंत्रणात आणण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात आले.

सिकलसेल जाणूया, सिकलसेल टाळूया” हा संदेश देत उपस्थितांना सिकलसेल आजाराची माहिती देण्यात आली. सिकलसेल आजारामध्ये वारंवार ताप येणे, थकवा जाणवणे, रक्ताची कमतरता, अशक्तपणा, सांधेदुखी, जंतुसंसर्ग होणे, पोटाच्या डाव्या बाजूस वेदना होणे व चेहरा निस्तेज दिसणे अशी लक्षणे आढळू शकतात. हा आजार पुढील पिढीत जाऊ नये यासाठी प्रत्येक युवक-युवतीने विवाहपूर्व तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले

सिकलसेल तपासणी ही शासकीय रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपलब्ध असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अथवा सिकलसेल समुपदेशक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले

कार्यक्रमाचे संचालन प्रमुख शास्त्र तंत्रज्ञ वर्षा डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका सिकलसेल सहाय्यक प्रवीण शिंदे यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास दराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर चाटे, डॉ. सैय्यद रेहान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकुमार साळवे, तालुका आरोग्य सहाय्यक दादाराव खरात, औषध निरीक्षक दिलीप मेहेत्रे, डॉ. बुधवत, डॉ. खान, डॉ. गाणार, अतिश जाधव, नारायण सुरवसे, नितीन इंगळे, लक्ष्मण राठोड, गणेश गवई, विशालराव खरात तसेच इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद१,६९९ लसीकरण बूथवर १ लाख १७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

शारदीय नवरात्रौत्सवात जागर महिला आरोग्याचा विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योग प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

येळेगाव येथे #राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती