vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

बुलढाणा शहरात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम;० ते ५ वर्षांच्या बालकांना डोस पाजण्याचे आवाहन

बुलढाणा शहरात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम;० ते ५ वर्षांच्या बालकांना डोस पाजण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी बुलढाणा शहरात विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात येणार आहे.
मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी बुलढाणा शहर परिसरात एकूण ३६ पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. पालकांनी आपल्या परिसरातील जवळच्या बूथवर बालकांना घेऊन जाऊन पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांनी केले आहे.
पोलिओसारख्या गंभीर आजाराचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे आवश्यक असल्याने कोणतेही मूल या मोहिमेपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे.
आरोग्य विभागाच्या या राष्ट्रीय उपक्रमात पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पाल्यांना पोलिओ प्रतिबंधक डोस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची नव्याने निश्चिती, रुग्णालय संलग्नीकरण निकष ठरविण्याकरिता समिती

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ५० हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

दिव्यांग बालकांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन

कोविडबाबत नमुंमपा आरोग्य विभाग दक्ष – रूग्णालयांत राखीव बेड्स नियोजन नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे व वैयक्तिक स्वच्छता बाळगण्याचे आवाहन

हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान कालावधीत प्रभावी आयोजन

तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन*

vishwatmaklokswamivarta