vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी समुपदेशन सेवा 

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी समुपदेशन सेवा

नांदेड प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै 2026 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) पुरवणी परीक्षा 16 ते 30 जून 2026 व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) पुरवणी परीक्षा 16 जून ते 8 जुलै 2026 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेली आहे.

परीक्षा काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक ७२०८४२९३८१, ९४०४७८३९९६, ९९६०६४४४११ याप्रमाणे आहेत.

जून-जुलै २०२६ परीक्षेपासून मंडळाकडून मुक्तांगण मित्र या संस्थेमार्फत इ. 10 वी व इ. 12 वी समुपदेशन यांना पालक व इतर परीक्षेसंदर्भात भ्रमणध्वनी क्रमांक ९११२७०९११२ द्वारे देण्यात येणार आहे.

याशिवाय टेलीमानस हेल्पलाईन नं. १४४१६ व मनोदर्शन हेल्प लाईन ८४४८४४०६३२ या हेल्पलाईनवरही समुपदेशन सेवा उपलब्ध आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या कार्यालयामार्फत ३१५ समुपदेशकांची सेवा पुरवण्यात आलेली आहे. त्यांचे मोबाईल नंबर व पत्ते मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे आवाहन डॉ. दिपक माळी सचिव राज्य मंडळ पुणे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्हाधिकार्‍यांकडून नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

युवकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे – डॉ. रणजित पाटील*अमरावती जिल्ह्यात 29 सप्टेंबरला तालुकास्तरावर 16 रोजगार मेळावे

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

vishwatmaklokswamivarta

बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग’ नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर