vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना ; गरजू लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना ; गरजू लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड प्रतिनिधी :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यावतीने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 50 टक्के अनुदान योजनेअंतर्गत 40, बीजभांडवल योजनेअंतर्गत 40 आणि थेट कर्ज योजनेअंतर्गत 80 लाभार्थ्यांचे उदिष्ट प्राप्त झालेले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील गरजू लाभार्थ्यांकडुन https://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी लाभार्थ्यांची वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असणे अनिवार्य असून ऑनलाईन अर्ज करताना जातीचा व उत्पन्नाचा मुळ दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधारलिंक असलेल्या बॅकेचे पासबुकची झेरॉक्स, टी.सी व मार्क मेमो सारखी शैक्षणिक कागदपत्रे, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, उद्यम आधार, शॉप अॅक्ट, संबधीत व्यवसायाचे प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट फोटो इ. कागदपत्राची प्रामुख्याने आवश्यकता आहे.

संकेतस्थळावर यशस्वीरित्या ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाच्या दोन प्रती नमस्कार चौक ग्यानमाता शाळे समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा कार्यालय नांदेड येथे प्रत्यक्ष जमा करणे आवश्यक आहे. या योजनेची सविस्तर माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हातील जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करुन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन महामंडळाचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

राज्यात मुंबई सह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…

vishwatmaklokswamivarta

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध

मतदान यंत्राच्या प्रथम स्तर तपासणी कार्यवाहीची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून पाहणी 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…