vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरीप पेरणीसाठी घाई करू नका ; 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – तालुका कृषी अधिकारी 

खरीप पेरणीसाठी घाई करू नका ; 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – तालुका कृषी अधिकारी

 

नांदेड प्रतिनिधी:- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे. परिसरात किमान 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन बियाण्यांची उगवण चांगली होईल व पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस पोषक वातावरण मिळेल. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान आधारित सल्ल्याचे पालन करावे. हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवरील जोखीम कमी होण्यास मदत होते.

तसेच, पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी करून बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. कमी उगवणक्षम बियाणे वापरल्यास अपेक्षित रोपसंख्या मिळत नाही व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, बियाण्यांना बुरशीजन्य व कीडजन्य रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी शिफारशीनुसार बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांचा वापर करावा, संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पेरणीचे नियोजन करावे. योग्य नियोजन, शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा अवलंब आणि हवामानानुसार निर्णय घेतल्यास खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित व यशस्वी खरीप हंगामासाठी तयारी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदनमहानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचा-यांचा कामगार दिनानिमित्त सन्मान

समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

दिव्यांग बांधवानी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

राज्याचे रत्ने व आभूषणे धोरण – २०२५ जाहीर राज्याच्या गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रासाठी झळाळी,एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्द‍िष्ट..