vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल)आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल)आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

 

 सांगली, सातारा प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) अशा तत्सम आस्थापनांना जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारानुसार नियमावली जारी केली असून या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेश जारी केले आहेत.

 आदेशात म्हटले आहे की, १) कॅफे शॉपमधील संपूर्ण बैठक व्यवस्था पुर्णपणे खुली असावी, सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत. दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत, क्युबिकल्स किंवा प्रायव्हेट केबीन/बंदीस्त कम्पार्टमेंट नसावेत व बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी. २) सर्व सार्वजनिक कॅफेमध्ये प्रवेशद्वार, पार्किंग आणि संपूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत यावी अशी सीसीटीव्ही यंत्रणा कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये बसविणे बंधनकारक आहे. तसेच कॅमेऱ्याचे फुटेज किमान 20 दिवस जतन करणे बंधनकारक करण्यात येत आहे. ३) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये प्रवेश देत असताना संबंधीत मुलां-मुलींच्या वयाची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असल्यास ओळखपत्रांची मागणी करण्यात यावी. ४) कॅफे शॉप (कॉफी कॅफे / हॉटेल) येथे सार्वजनिक सुव्यवस्था आणि सभ्यतेचे पालन करावे, दारू सेवन/ धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ५) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) येथे ध्वनीक्षेपण व्यवस्था ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी. ६) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांसाठी भेट पुस्तिका (व्हीजीट बूक) ठेवावे. ७) सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे /हॉटेल) हे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, ८) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) येथे व्यवसाय सुरू करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून (महानगरपालिका/नगरपरिषद/नगर पंचायत) आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. व्यवसायाचे ठिकाण स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेच्या निकषांनुसार कार्यवाही करण्यात यावी. 9) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) येथे ग्राहकांना खाद्यपदार्थ व पेयपदार्थ देण्याचा व्यवसाय करत असल्यास संबंधित प्राधिकरणाकडून ईटिंग हाऊस परवाना घेणे आवश्यक आहे. १०) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) येथे अन्नपदार्थांची विक्री, साठवण, प्रक्रिया किंवा वितरण करणाऱ्या सर्व व्यावसायिक आस्थापनांसाठी FSSAI नोंदणी अथवा परवाना घेणे बंधनकारक आहे. ११) कॅफे शॉप (कॉफी कॅफे / हॉटेल) येथे अग्निसुरक्षेच्या आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याबाबत संबंधित अग्निशमन विभागाकडून Fire Safety NOC प्राप्त करणे आवश्यक आहे. १२) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) येथे खाद्यपदार्थांच्या विक्रीसंदर्भात लागू असलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवानगी/नोंदणी घेणे आवश्यक राहील. १३) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) येथे ग्राहकांच्या मनोरंजनासाठी रेकॉर्डेड संगीत, गाणी, व्हिडिओ किंवा इतर कॉपीराइट संरक्षित साहित्य सार्वजनिकरीत्या वाजविले जात असल्यास कॉपीराइट अधिनियम, 1957 मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. १४) कॅफे शॉप (कॉफी कैफे/हॉटेल) Shop and Establishment Act अंतर्गत नोंदणी व परवाना घेणे बंधनकारक आहे. १५) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) येथील व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर २० लाख रुपयांपर्यंत असल्यास संबंधित नियमांनुसार GST नोंदणी आवश्यक आहे. १६) कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) येथे दुकान/कॅफेचे नावफलक (Sign Board) स्पष्ट व नियमांनुसार लावण्यात यावेत. या सर्व बाबींचे उल्लघंन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

         या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हे सक्षम प्राधिकारी असतील. नियमावली प्रमाणे तपासणीचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना असतील. हा आदेश दि. 25 जून 2026 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतुकीविरोधात जिल्हाधिकारी ‘ॲक्शन’ मोडवर,पोलीस, आरटीओ, महसूल प्रशासनाला संयुक्त कारवाईचे दिले निर्देश..

गावाच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबबावे- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे- अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा –जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

महिला व बाल विकास कार्यालयाकडून तयार केलेल्यानारीबलम पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

आज सोमवार जिल्हा ग्रंथोत्सव याचा शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल

vishwatmaklokswamivarta