
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. गुन्हे शाखेच्या चौकशीत १२ साक्षीदारांनी त्यांच्या विरोधात साक्ष दिल्याने आता सिंग पुरते अडकले जाण्याची शक्यता.
मुंबई : प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. गुन्हे शाखेच्या चौकशीत १२ साक्षीदारांनी त्यांच्या विरोधात साक्ष दिल्याने आता सिंग पुरते अडकले जाण्याची शक्यता आहे. “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच सचिन वाझेचे १ नंबर बाँस” असा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून सीआयडी, लाचलुचपत विभाग तसेच गुन्हे शाखा त्यांची चौकशी करीत आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच वाझेचे 1 नंबर बॉसदरम्यान गुन्हे शाखेच्या चौकशीत १२ साक्षीदारांनी दोघांविरोधात साक्ष दिली आहे. तसेच हे सर्व जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदवण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. परमबीर या़ंच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सध्या गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत. याच गुन्ह्यात परमबिर सिंह यांना काल (ता.१२) चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स करण्यात आले होते मात्र ते गैरहजर राहिले. या गुुन्ह्यात १२ जणाचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून या १२ जणांनी अँटिलिया घटना आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला सचिन वाझे याचा नंबर वन बाँस हा परमबीर सिंह होता. असे जबाबात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून सीआयडी,लाचलुचपत विभाग तसेच गुन्हे शाखा त्यांची चौकशी करीत आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. इतर यंत्रणांबरोबरच गुन्हे शाखेचे अधिकारी देखील परमबीर यांच्या शोधात आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष चौकशी आवश्यक असल्याचे कारण देत गुन्हे शाखेने परमबीर यांना नोटीस धाडली आहे



