vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील“स्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, आजही लोकांना चुकीची माहिती”: मोहन भागवत

हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील“स्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, आजही लोकांना चुकीची माहिती”: मोहन भागवत

नवी दिल्ली प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विविध स्तरावरून मोठी विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वीर सावरकराच्या संसदेत लावलेल्या तसबिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी वीर सावरकरांबाबत अनेक मोठी आणि महत्त्वाची विधाने करण्यात आली. स्वातंत्रवीर सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिल्यात. वीर सावरकरांबद्दल आजही चुकीची माहिती समाजात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले आहे.

 

 

स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. माहिती आयुक्त आणि माजी पत्रकार उदय माहूरकर यांच्या ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी भागवत बोलत होते.

वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव

आजही भारतात वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की, राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांबद्दल बोलू नका. हिंदुत्वाचे सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील, असे मोहन भागवत यांनी नमूद केले

सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते आणि त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिली होती. मतभेद स्वाभाविक आहेत. जरी आपण वेगळे असलो तरी आपण एकत्र चालत राहू, वादविवाद होईल. हा आपल्या राष्ट्रीयत्वाचा मूलभूत घटक आहे. ज्यांना ते माहिती नाही त्यांनी सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू केली आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार पात्र, उद्धव ठाकरे यांना धक्का….

vishwatmaklokswamivarta

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाच्या सर्वेक्षणासदि.2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारांचा सहभाग चांगला राहिला आहे, दुपारी ३:०० वाजेपर्यंत १२२ मतदारसंघांमध्ये अंदाजे ६०.४०% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त,आनंदाचा शिधा संचाचे पात्र शिधापत्रिकाधारकांना वितरण

vishwatmaklokswamivarta

देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान; महाराष्ट्र एनसीसीला ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ प्रदान एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतात – राज्यपाल रमेश बैस

मध्यप्रदेशातील बागेश्वर धाम चे प्रमुख महंत बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस….