
अभिनेत्री नोरा फत्तेहीला ED ने बजावलं समन्स
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी संचालनालयाने (Ed) अलीकडेच मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फत्तेहीला (nora fatehi) समन्स बजावलं आहे. अभिनेत्री नोरा फत्तेहीला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. हा खटला सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे, ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आधीच नोंदवण्यात आला आहे.
रोहिणी तुरुंगात अंडर ट्रायल सुकेशवर एका व्यावसायिकाकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेशच्या विरोधात खंडणीच्या 20 स्वतंत्र तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.



