vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

सीबीआय, ईडी, एनसीबी, प्राप्तिकरसारख्या संस्थाचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

सीबीआय, ईडी, एनसीबी, प्राप्तिकरसारख्या संस्थाचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई : प्रतिनिधी  सीबीआय, ईडी, एनसीबी, प्राप्तिकरसारख्या संस्थाचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे.‘,लखीमपूरच्या हत्याकांडाला मी जालियनवाला बाग सदृश घटना असे म्हणालो. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्राप्तिकर विभागाने अजित पवार, त्यांच्या बहिणींच्या घरासह संबधितांवर छापे टाकले. केंद्रीय तपास यंत्रणाचे अधिकारी हे ‘पाहुणे’ म्हणून येणार याची कल्पना होती. पण पाहुण्यांनी किती दिवस घरात मुक्काम करावा याला काही मर्यादा असते,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लगावला. राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईवर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले की, ‘‘जिथे छापे पडले त्याची चौकशी दिवसभरात होणे शक्य आहे. पण हे अधिकारी सहा दिवस झाले तरी घरातून बाहेर पडत नाहीत. दिल्लीतून आदेश येईपर्यंत घरातून बाहेर पडायचे नाही, असे काही अधिकाऱ्यांकडूनच समजते. म्हणून हे सरकारी पाहुणे सहा दिवसांपासून मुक्काम ठोकून आहेत. इतक्या दिवस पाहुण्यांनी पाहुणचार घेणे कितीपत योग्य आहे? सीबीआय, ईडी, एनसीबी, प्राप्तिकरसारख्या संस्थाचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे.

राजकीय हेतूने वापर सुरू आहे. अनिल देशमुखांबद्दल तत्कालीन पोलिस आयुक्तांनी आरोप केले. त्यामुळे देशमुखांनी राजीनामा दिला. पण ज्या जबाबदार अधिकाऱ्याने आरोप केले ते कुठे आहे ?’’ अनिल देशमुखांच्या घरावर पाच वेळा ‘सीबीआय’ने छापा टाकला. हे कितीपत योग्य आहे, याचा विचार जनतेने करायला हवा, असेही पवार म्हणाले.अधिकाऱ्यांवर टीका‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईबाबत शरद पवारांनी गंभीर चिंता व्यक्त केली. वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी काही मते मांडली, त्यावर भाजपचे नेते खुलासा करायला समोर येतात. याचाच अर्थ एनसीबी आणि भाजपचे संगनमत असून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत आहे हे सिद्ध होते, असे पवार यांनी स्पष्ट केले. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या छाप्यामधे पंच म्हणून गोसावी नावाची व्यक्ती ‘एनसीबी’ने समोर केली. पण सध्या हाच पंच फरार आहे. अशा संशयास्पद व्यक्तीची पंच म्हणून निवड होते, यावरूनच या अधिकाऱ्यांचे लागेबांधे कोणासोबत आहेत, हे सिद्ध होते, असेही पवार म्हणाले.

संबंधित पोस्ट

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  /23 भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत 10 उमेदवारांनी दाखल केले अर्ज

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे, पिंपरी आणि बुलढाण्यातील तीन कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पद नाकारल्याची  कबुली  राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील दिली 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील मोठी बातमी- अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं,महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती.

vishwatmaklokswamivarta

14 वेळा निवडून कोणत्याच निवडणूकीत पराभव झाला नाही,लोकांनी निवडूनच दिलं पण आता निवडणूका लढणार नसल्याचं  राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख शरद पवार म्हणाले

vishwatmaklokswamivarta